New Announcement

प्रति,

सर्व सभासद बंधु भगिनींनो,

      इलेक्ट्रोहोमिओपॅथी मान्यते संदर्भात सर्व चिकित्सका मध्ये गांभीर्य निर्माण व्हावे आणि योग्य दिशेने पुढील कार्य पुर्णत्वास जावे यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.                                  

      सिस्टमच्या मान्यतेसाठी सुरु असणार्‍या कार्यामधील सर्व घडामोडी वेळोवेळी सर्वांसामोर मांडल्या जात आहेत. मार्ग जरी खडतर असला तरीही या सिस्टमला मान्यता मिळवणे हा एकच ध्यास घेवुन संघटनात्मक काम सुरु आहे.                                   

       मान्यतेच्या लढ्यातील या अंतिम टप्प्यामध्ये उर्वरित कार्य पूर्ण करून मान्यता मिळविणारच हा आमचा विश्वास आहे. या कार्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव MAEH ही संघटना राष्ट्रीय स्तरावरील ERDO या संघटने सोबत अविरत कार्यशील आहे.    

      खरी परिस्थिती पाहता राष्ट्रीय स्तरावर देखील प्रमुख चार ते पाच संघटनाच या कार्यात सक्रियतेने प्रयत्नशिल आहेत. “करो अथवा मरो”असे स्पष्ट पने IDC कमिटी कडून सुचित केलेलें असताना ही कोणी या गोष्टी गांभीर्याने घेताना दिसत नाही. यामुळें राष्ट्रीय स्तरावर देखील उर्वरित संस्था-संघटना यांचा या खडतर प्रवासामध्ये कोणताही सक्रिय सहभाग दिसत नाही.

       तीन वर्षापूर्वी संपूर्ण देशभरातुन २९ संस्थांनी सिस्टमच्या मान्यतेसाठी प्रपोजल सबमिट केल्या नंतर त्यातील जॉईंट प्रपोजल लिस्ट म्हणुन २२ संस्थातर्फे एक जॉईंट प्रपोजल देण्यात आले. त्यानंतर या २२ संस्था/संघटना आज कोणतेही  काम करीत नसल्या तरी जे मोजके लोक काम करीत आहेत ते मात्र पुढील सर्व गोष्टी जॉइंट प्रपोजल लिस्ट कमिटी याच नावाने  करीत आहेत. 

आपला मुख्य उद्देश हा शक्य ते सर्व बळ एकवटून सिस्टमला मान्यता मिळवणे एवढाच आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या आयडीसी कमिटीकडून वेळोवेळी मागितलेली माहिती आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठराविक लोक सर्वस्व पणाला लावत आहेत. या प्रयत्नातून पार्ट (1) या स्वरूपात काही डॉक्युमेंट्स IDC कमिटी च्या सुचनेनुसार सादर केली आहेत.   

        यात समाधानाची गोष्ट म्हणजे या शेवटच्या टप्प्यात आयडीसी कमिटीकडून 11 जानेवारी 2021 च्या बैठकीत आपणास दिलेल्या आश्वासना प्रमाणे सध्या सुरू असणार्‍या कामामध्ये त्यांचे योग्य मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे आपले काम करीत राहणे हा धर्म ठेवून सातत्याने कार्यरत राहणे यावरच लक्ष्य केंद्रित केले आहे. येत्या सहा महिन्यांमध्ये सिस्टम च्या मान्यतेचा निकाल १००% अपेक्षीत आहे.

        या सुरू असणार्‍या कामकाजा दरम्यान काही राज्य, जिल्हा कार्यकारणी सदस्य तसेच इतर सहकारी यांचेशी फोन कॉल्स किंवा व्हाट्सअप च्या माध्यमातून पुढील कामा बाबत काही चर्चा होतात त्यातुन काही सूचनाचां विचार करून खालील प्रमाणे काही अंतिम निर्णय घेण्यात येत आहेत.                             

        दि.1 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षात (1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022) आपल्या संघटनेची वार्षिक मेंबर्शिप फी पूर्वीप्रमाणेच 1000/ राहील. यानुसार आपल्या पुढील कामाची सत्यस्थिती समजुन घेवुन सर्वांनी आपली वार्षिक मेंबर्सशिप भरुन सहकार्य करावे.        

        या मागील आवाहनास प्रतिसाद देवुन ज्या 131 लोकांनी ERDO  या राष्ट्रीय संघटनेची लाईफटाइम मेंबरशिप भरलेली आहे. त्यांना ERDO याच संघटनेचे लाईफटाइम मेंबर्सशिप सर्टिफिकेट ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) संभदिताना आज पासुन पोस्टाने पाठवित आहोत. या सर्वांचे पुन्हा एकदा खुप खुप मनःपूर्वक आभार!! तुमच्या सहकार्यामुळे काही प्रमाणात आम्हाला पुढील काम करता आले.                                  

        यापुढें सर्वांनी एक तर MAEH या संघटनेची वार्षिक मेंबरशिप भरावी अथवा ERDO या संघटनेची लाईफ टाईम मेंबरशिप भरावी. आपल्या परिस्थितीनुसार किंवा आवडी निवडीनुसार कोणताही एक पर्याय निवडून सहकार्य करावे.        

         त्याच प्रमाणे मागील वर्षी सांगितल्याप्रमाणे मेंबर्सशिप फी मधील 25% रक्कम ही यावर्षी पासुन जिल्हा कार्यकारिणीकडे त्या त्या जिल्हा स्तरीय स्थानिक कामकाजासाठी वर्ग करण्यात येईल. याबाबत योग्य ती आचारसंहिता जिल्हा कार्यकारिणीस स्वतंत्रपणे देण्यात येईल.                        

        संघटनेने सुरवातीपासुनच गेल्या ३० वर्षात कधीही कोणालाही  मेंबर्सशिप किंवा इतर फी बाबत जबरदस्ती केलेली नाही. किंवा यापुढेही केली जाणार नाही. येवढेच नाही तर अगदीं  २००/२५० लोकांच्या वर कधी संपुर्ण महाराष्ट्रातुन मेंबर्सशीप ही भरीत न्हवते. तरीही संघटनेचे काम सतत सुरूच होतें. गेल्या वर्षी पासुन मेंबर्सशिप मध्ये वाढ झाली असून ती कुठेतरी आता 774 पर्यंत पोहोचली आहे. तसेच या गोष्टीचां कामासाठी खुप उपयोग देखील झाला आहे. प्रत्यक्षात फी भरून सदस्य होणारे मोजकेच सदस्य असतात मात्र बेरीज गुणाकार करणारी मंडळी वास्तव

समजुन न घेता मोठी अतिशयोक्ती निर्माण करीत असतात. संघटनेकडे जे चिकित्सक मेंबरशिप फॉर्म व फी भरतात त्यांना मेंबर्सशिप सर्टीफिकीट आणि ओळखपत्र देणे संघटनेचे कर्तव्य आहे.

        गेल्या वर्षी (2020/ 2021) मध्ये काही लोकांना काही कारणांनी मेंबरशिप मिळाली नाही. त्यांनी आता तात्काळ व्हाट्सअप मेसेज करून तसे कळवावे. त्यांना यावर्षीची (2021/ 2022) ची मेंबरशिप पाठविण्यात येईल. दि.१ एप्रिल 2021पासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये www.electrohomoeopathy.co.in या  संघटनेच्या वेबसाइटवरून अनेक सुविधा दोन दिवसानंतर १३ एप्रिल २०२१ या “गुढीपाडव्याच्या” शुभ मुहूर्तापासुन देण्यात येतील. या नवीन वेबसाईटवरून आपणास आवश्यक असणारी नवीन जुनी कागदपत्रे क्षणार्धात डाउनलोड करून त्यांची प्रिंट मिळविता येईल. मेम्बर्स असणार्‍या कोणत्याही व्यक्तीस काहीही अडचण आल्यास आपल्या जिल्हा कार्यकारणी सदस्य किंवा राज्य कार्यकारणी सदस्यांना तात्काळ कळवू शकता तसेच वेबसाईटवर उपलब्ध असणार्‍या माहिती व कागदपत्रांचा उपयोग आपणास आपल्या या अडचणीच्या क्षणी निश्चितपणे करता येवू शकतो. संपूर्ण मेंबर्स यांची यादी देखिल मेंबर्सशिप नंबर व फोटोसह येथे उपलब्ध असेल.

        अशा पध्दतीने सर्व जिल्हा स्तरावर यापुढें शिस्तबद्धतेने कार्य होणें अपेक्षीत आहे. संघटना रूपाने सर्व सदस्यांना वार्षिक जमाखर्च व याचे ऑडिट देणें, सुरू असणार्‍या कामा विषयाची माहिती वेबसाइट द्वारे तसेच व्हॉट्स ऍप वर देत राहणे संघटनेचे कर्तव्य आहे. याच पद्धतीने संघटनेचे सदस्य या रूपाने आपले ही कर्तव्य आपण सर्वांनी पार पाडावे. हीच अपेक्षा !!

धन्यवाद !!!

                                                  आपला

                                                                                                   श्री. सतीश जगदाळे

                                                                                                   अध्यक्ष, (महाराष्ट्र राज्य)                 

* मेंबर्सशिप प्रक्रियेसंदर्भात माहिती *

*मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी (महाराष्ट्र राज्य)

   वार्षिक मेंबरशिप एक हजार रुपये

अकाउंट डिटेल्स   

Name -Medical Association of Electrohomoeopathy.

Bank – State Bank of India (SBI)                    

Current A/C No – 35402822551

IFSC CODE -SBIN0008752           

इलेक्ट्रोहोमिओपॅथीक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (इंडिया )अकाउंट डिटेल्स

 लाईफ टाईम मेंबरशिप पाच हजार रुपये.

Name- Electrohomoeopathic Research & Dev.Org.

Bank- HDFC BANK  

Currunt A/C No – 50200057396783     

IFSC CODE-HDFC0000837.  

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

Recent Comments

    Find Us

    Address
    403 Isha Residency, Gujarwadi Road, Katraj, Pune-411046

    Mobile

    8605105328

    9822999956